COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन व्हायरल होत असतं. हा व्हिडिओ बॉलिवूड दिग्गज अभिनेता मनोज कुमार सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा आहे. ज्याचं खरं नाव कमल असं हा असून या व्यक्तीने पूर्णपणे बॉलिवूड अभिनेता मनोज कुमार यांच्यासारखा अभिनय केला आहे. एवढंच काय तर त्याने त्यांच्या सारखा डान्स देखील केला आहे. लोकं देखील त्यांना ड्युप्लीकेट मनोज कुमार असल्याचं सांगत आहेत.


व्हिडिओत ही व्यक्ती 1965 साली आलेल्या 'हिमालय की गोद में' या सिनेमातील 'चांद सी महबूबा' या गाण्यावर डान्स करत आहे. डान्स दरम्यान यांच्या व्हिडिओ बनवण्यात आला. 'पूरब और पश्चिम', 'उपकार' आणि 'क्रांती' सारख्या देशभक्तीवर आधारित सिनेमांकरता अभिनेता - दिग्दर्शक मनोज कुमार ओळखले जात असतं. या त्यांच्या योगदानाकरता 'दादासाहेब फाळके पुरस्कार' देण्यात आला. 


हरिकृष्ण गिरी गोस्वामी उर्फ मनोज कुमार यांच्या जन्म एबटाबादमध्ये झाला. स्वातंत्र्य होण्या अगोदर हा भाग भारतातच होता. 'काँच की गुडिया' 1960 मध्ये आलेल्या या सिनेमातून रोमँटिक नायक म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली.