मुंबई : 


शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी|


नांदतो देव हा, आपुल्या अंतरी||


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आषाढी एकादशी... पंढरपुरात भक्त मंडळींचा पूर लोटलाय... पण हे काय? ज्याच्या दर्शनासाठी भक्तमंडळींना ओढ लागून राहिलीय तो विठ्ठलच 'मिसिंग' झालाय? कुठे हरवलाय 'विठ्ठल'?


हा विठ्ठल तुझ्याच देही|


तू ओळखलास नाही||


तू शोध तुझ्यातच विठ्ठल|


तुझा विठ्ठल मिसिंग नाही||


असं म्हणत, हरहुन्नरी कलाकार मकरंद सावंत, पराग सावंत, तुषार घाडीगावकर या डिजीटल युगातल्या काही भक्त मंडळींनी हरवलेल्या विठ्ठलाला शोधण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं वायरल होताना दिसतोय.