पुणे : चार गुरु-शिष्यांचे पहिल्यांदाच एकत्रित सादरीकरण पाहण्याची पर्वणी यंदा पुणेकरांना मिळतेय.


कोण आहेत हे गुरु-शिष्य?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लुई बॅंक्स - जिनो बॅंक्स (पिता-पुत्र), विद्वान विक्कू विनायकराम – सेल्वा गणेश (पिता-पुत्र), गणेश राजगोपालन - कुमरेश राजगोपालन (भाऊ-भाऊ) आणि तौफिक कुरेशी – उस्ताद झाकीर हुसेन (भाऊ-भाऊ) अशा चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अदभूत अशी 'विरासत' पुणेकरांना अनुभवता येणार आहे.


१५ फेब्रुवारीला रंगणार मैफल


भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गुरु – शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरु आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरु – शिष्यांच्या सुप्रसिद्ध जोड्यांची रंगलेली मैफल अनुभवण्याची संधी पुणेकरांना १५ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वा. महालक्ष्मी लॉन्स , डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर इथं मिळणार आहे.


'विरासत'चं खास वैशिष्ट्य


या कार्यक्रमात दोन ग्रॅमी व पद्मभूषण पुरस्कर्त्यांचे वादन एकाच रंगमचावर ऐकण्याची दुर्मिळ संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'विरासत'मध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध घट्टंम वादक पद्मभूषण विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तैफिक कुरेशी – प्रसिद्ध तबलावादक ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध बंधू समाविष्ट होणार आहेत, शिवाय प्रसिद्ध वादक लुई बॅंक्स - जिनो बॅंक्स ही पिता – पुत्रांची जोडी,  कर्नाटकचे प्रसिद्ध व्हायोलीन वादक गणेश – कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरु – शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे.  यातील गुरु – शिष्यांचे एकत्रित सादरीकरण अनेकदा बघायला मिळते मात्र चार गुरु – शिष्य, बंधू, पिता – पुत्र अशा जोड्यांचे एकाच वेळी सादरीकरण हे 'विरासत'चे खास वैशिष्ट्य असून असा दुर्मिळ योग पहिल्यांदाच घडणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन गाडगीळ ही पिता – पुत्राची जोडी करणार आहे.


कुठे मिळतील तिकीटं?


या कार्यक्रमाची तिकिट विक्री 'बुक माय शो'वर ऑनलाईन चालू असून प्रत्यक्ष तिकिटे बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी ९ ते ११.३० व संध्याकाळी ५ ते ७ मधे मिळू शकतील. ग्रुप बुकिंगसाठी ९१४५५०८०८८ या नंबरवर संपर्क साधता येणार आहे असेही रानडे यांनी नमूद केले.