मुंबई : इटलीमध्ये विराट - अनुष्काचा शाही विवाह सोहळा संपवून कुटुंबिय भारतात परतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरी हा विवाह सोहळा इटलीत साजरा झाला असला तरीही संपूर्ण विधी या भारतीय पद्धतीने करण्यात आला. हळदी पासून मेहंदीपर्यंतच्या सगळ्या पद्धती अगदी भारतीय रंगात रंगल्या होत्या. यासगळ्याबरोबरच अजून एक माहिती समोर येते आणि ती म्हणजे लग्नाच्या खर्चाशी निगडीत आहे. 


किती झाला खर्च ? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नात जवळपास १०० करोड रुपयांच्या जवळपास खर्च झाला. असं सांगितलं जातं आहे की, या लग्नात एका नातेवाईकावर जवळपास १ करोड रुपये खर्च झाला आहे. यातून स्पष्ट होतं की, आपल्या लग्नाला रॉयल करण्यासाठी विराट - अनुष्काने अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. 


रिपोर्टनुसार, लग्नात ५० असे जवळची मंडळी होती. इथे एका व्यक्तीचा आठवडाभर थांबण्याचा खर्च जवळपास १ करोड रुपये आहे. याचा हिशेब केला तर विराट आणि अनुष्काच्या नातेवाईकांना थांबण्यासाठीच ४५ ते ५० करोड रुपये खर्च केले आहेत. 
या लग्नाला इंडियन टच देण्यासाठी शहनाई, ढोल - ताशे आणि भांगडा देखील उपस्थित होता. असं अंदाज वर्तवला जात आहे की, अनुष्का आणि विराटच्या लग्नात जवळपास ७५ ते १०० करोड रुपये खर्च केले जात आहेत. 


टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, ही शाही सोहळा पूर्णपणे पंजाबी पद्धतीने पार पडला. ४६ वर्षाचे पंजाबी ब्राम्हण पुजारीने हा विवाह संपन्न केला आहे. इटलीच्या एका मंदिरात हा सोहळा पार पडला. लग्न करणारा हा पंडित पवन कुमार कौशल हे पंजाबचे कपूरथला जिल्ह्यातील राहणारे आहे. पवन कुमार कौशलने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, त्यांना असं वाटतं होतं की ते या दीड दिवसाच्या लग्नाचे "मॅन ऑफ द मॅच" आहेत.