मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आसतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दोघांचं लग्न झालं तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. गेल्यावर्षी अनुष्का आणि विराट यांनी आई-वडील झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीचा जन्म, तिचा सांभाळ आणि दोघांचं व्यस्त वेळापत्रत या सर्व गोष्टींमुळे अनुष्का आणि विराट एकत्र येवू शकले नाहीत. पण आता मुलगी वामिकाच्या जन्मानंतर पहिल्यांदा दोघांना रिकामा वेळ मिळाला आहे. 



रिकामा वेळ मिळताचं अनुष्का आणि विराटने रोमँटिक फोटोशूट केलं आहे. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये विराट रुबाबदार तर अनुष्का ग्लॅमरस दिसत आहे. 


सोशल मीडियावर फोटो शेअर होताचं काही क्षणांतचं व्हायरल झाले आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही दोघांच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. या कपलला खूप हॉट म्हणत आहेत. एवढंच नाही तर अनुष्काच्या प्रेग्नेंसीनंतर वजन वाढण्याबाबतही चर्चा होताना दिसत आहे.