विराट कोहली अनुष्कावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
विराट- अनुष्काच्या `त्या` VIDEO ची का होतेय चर्चा? नेमकं व्हिडिओत केलं तरी काय?
मुंबई : देशातील प्रसिद्ध आणि हिट जोडींपैकी एक असलेल्या टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघेही नेहमीच चर्चेत असतात. दोघे इतके प्रसिद्ध आहेत की त्यांची कोणतीही कृती चर्चेत येते. आता या दोघांची अशीच एक कृती कॅमेरात कैद झाली आहे. या कृतीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा घराबाहेर पडले असतानाच पापाराझींचा कॅमेरा त्यांना स्पॉट करतो. या व्हि़डिओत अनुष्का शर्माची कृती चर्चेचा विषय ठरतेय. या व्हिडीओत ती लहान मुलांसारखी वागताना दिसत आहे.
व्हिडिओत काय?
व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा एका वेगळ्याचं मुडमध्ये दिसली आहे. अनुष्का लहान मुलांसारख विचित्र कृत्य करताना दिसतेय. अशा स्थितीत चाहत्यांसह विराटही थोडं आश्चर्यचकित झालेला दिसला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनुष्का लहान मुलासारखी वागत आहे आणि विराट तिची काळजी घेताना आणि तिली सावरताना दिसत आहे. यानंतर विराटने अनुष्कासोबत पोज दिली आणि नंतर कारमध्ये बसुन निघून गेले. यादरम्यान विराट कोहलीच्या चेहऱ्यावर रागाचे भावही स्पष्ट दिसत होते.
विराट अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यासोबतच अनुष्काच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर विराट कोहलीला जेंटलमेंट म्हटलं जात आहे. विराट अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असून कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.