मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांची मुलगी वामिका (Vamika)हिचा एक फोटो पाहण्यासाठीसुद्धा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अनुष्का आणि विराटनं ठरवल्याप्रमाणं मुलीचा एकही फोटो आतापर्यंत शेअर केलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, नुकताच वामिकाचा पहिला फोटो, जिथे तिचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसत होता असा फोटो व्हायरल झाला. 


बस्स, मग काय. साऱ्या जगानं पाहिलं की विराट आणि अनुष्काची ही लाडाची लेक नेमकी दिसते तरी कशी. 


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यादरम्यान वामिका अनुष्कासोबत दिसली. 


वामिकाच्या चेहऱ्यावर असणारं हास्य, आनंद नेटकऱ्यांची मनं जिंकून गेला. अनेकांनीच तिच्या फोटोचं निरिक्षण करत ही हुबेहूब विराटसारखी दिसत असल्याचं सांगितलं. 


काहींनी वामिका आणि विराटच्या बालपणीचे फोटो कोलाज करत ते पोस्ट केले आणि या  बापलेकिच्या चेहऱ्यामध्ये किती साम्य आहे हे दाखवून दिलं. 


आश्चर्य म्हणजे वामिकाचा आणि विराटच्या बालपणीचा फोटो पाहिलं असता यांच्यामध्ये फार फरक नाही हेच स्पष्ट होत आहे. 


विरुष्काच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरीही अद्यापही या जोडीनं मुलीचा अधिकतपणे एकही फोटो पोस्ट केलेला नाही हेच खरं. 





वामिकाचे फोटो क्लिक आणि प्रिंट करु नका... 
लेकिचे मैदानात टीपले गेलेले फोटो पाहता, अनुष्कानं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करत तिचे फोटो क्लिक करु नये, तसंच प्रिंट अथवा प्रसिद्धही करु नये असं म्हणत आपण यापूर्वीच या निर्णय़ामागचं कारण सांगितल्याची बाब अधोरेखित केली.