मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा होत असतात. विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विराट एका अमेरिकन टीव्ही शो 'इन डेप्थ ग्रॅहम बेन्सिंर' या कार्यक्रम पोहचला होता. त्यावेळी विराटने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल बोलला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदा अनुष्का आणि विराट एका शॅम्पूच्या कॉमर्शियल जाहिरातीसाठी दोघे एकत्र आले होते. विराटने अनुष्काला पहिल्यांदा भेटण्याबद्दल किस्सा शेअर करताना सांगितले, की पहिल्यांदा अनुष्काला भेटतांना मला फार दडपण आलं होतं.


 



या भितीमध्ये मी माझ्या उंचीबद्ल विनोद केला. त्यामुळे तिथेल वातावरण थोडे गंभीर झाले होते. मला त्यावेळी कळत नव्हतं की, मी काय करायला पाहिजे. आमच्या जाहिरातीचे चित्रिकरण तीन दिवसाचे होते. या जाहिरातीच चित्रिकरण वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळेवर करायच होते.


या जाहिरातीनंतर आमच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. आमच्या दोघांमध्ये फार साम्य होते. जरी आमचे क्षेत्र हे वेगवेगळे आहेत. मात्र आम्ही आमच्या क्षेत्रात फार यशस्वी आहोत. अनुष्कात आणि माझ्यात फार सारखेपणा आहे.


 



यानंतर आम्ही लग्नाचा विचार केला. लग्नाचा विचार केल्यानंतर, मी एका क्रिकेट सीरीजमध्ये व्यग्र होतो. त्यामुळे लग्नाचे संपूर्ण प्लॉनिंग हे अनुष्काने केले. लग्न कुठे करायचे आणि लग्नाची गोष्ट ही फक्त घरच्यांमध्येच असायला पाहिजे, असं तिने मला सांगितले होते.


विराट आणि अनुष्काच्या लग्नात फक्त २२ लोक उपस्थित होते. मुंबईत परत आल्यावर विराट आणि अनुष्काने दोन रिसेप्शन दिले होते. एक बॉलिवूड स्टारसाठी आणि एक क्रिकेटरांसाठी. अनुष्का आणि विराटच लग्न इटलीत मोठ्य़ा थाटात झाले होते.


 



त्यानंतर विराटने त्याच्या हनीमूनचा एक किस्सा शेअर करतांना सांगितलं की, आम्ही हनीमूनसाठी फिनलँडला गेले होतो. त्यावेळी फिनलँडमध्ये खूप बर्फ पडत होता. त्यामुळे तिथलं वातावरण फार सुंदर शुभ्र झाले होते.    


आम्हाला हनीमूनसाठी अशा ठिकाणी जायच होते की, तिथे आम्हाला कोणी ओळखत नसेल, त्यामुळे आम्ही फिनलँडला जाण्याच ठरविले. नंतर आम्ही कॉफी पिण्यासाठी बाहेर गेलो. त्यावेळी एक भारतीय व्यक्ती तिथे होता. त्याने आम्हाला ओळखलं.


 



त्या व्यक्तीने सांगितलं की माझ आडनाव सुद्धा कोहली आहे. त्यामुळे मी असा विचार केला की, जगाच्या कुठल्याही गेलं, तर भारतील लोक भेटतातच. अनुष्का आणि विराट विवाह बंधनात डिसेंबर २०१७ ला अडकले होते. त्यांचं लग्न झाल्यावर त्यांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. होते.