मुंबई : जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन माध्यमांतून सेलिब्रिटी मंडळी अनोख्या रुपांत, अनोख्या व्यक्तींसह विविध मार्गांनी आणि तितक्याच बहुविध कारणांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या घरी येणाऱ्या पाहुणे मंडळींची भेट घडवून आणण्यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी आघाडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वातील विराटच्या मित्रांपासून ते अगदी विराटच्या नवनवीन रुपांपर्यंत प्रत्येक गोष्टीची झलक विराट किंवा खुद्द अनुष्का या दोघांपैकी एकाच्या सोश मीडिया अकाऊंटवरुन पाहायला मिळाली आहे. हे सारं सुरु असतानाच आता या सेलिब्रिटी जोडीच्या घरी एक भलताच आणि अगदी दुर्मिळ प्राणी आल्याचं बोललं जात आहे. 


हा प्राणी दुर्मिळ म्हणण्यापेक्षा आता त्याचं अस्तित्वंच नाही, अशा प्रकारचा आहे. की अनुष्का- विराटच्या घरी, तेसुद्धा लॉकडाऊनच्या काळात हा प्राणी पोहोचला तरी कसा? 


तर, उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच तुम्ही अंदाजपंचे उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्याची झलक पाहूयाच. 



खुद्द अनुष्कानेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करत मला घरात डायनासोर दिसला आहे, असं कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये अनुष्काचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, एका डायनासोरप्रमाणे दबक्या पायाने चालताना दिसत आहे. थोडक्यात काय, तर हा विराट म्हणजेच अनुष्का दिसलेला डायनासोर. मग, कसं वाटलं विराटचं हे रुप?