मुंबई : देशात सध्या CAA आणि NRC कायद्यावरून संतापाची लाट उसळली आहे. देशात या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनं देखील करण्यात येत आहेत. अशात अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे प्रचंड नुकसान सुद्धा झाले. या आंदोलनाच्या समर्थनार्थ कलाकार देखील रस्त्यावर उतरले असताना 'पंगा' चित्रपटाच्या ट्रेलर दरम्यान अभिनेत्री कंगना रानौतला यासंबंधतीत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी निशाना साधला. तर याप्रकरणी प्रसिद्ध गायक विशाल ददलानी देखील कंगनाला चांगलेचं सुनावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या वक्तव्यावर निशाना साधत तो म्हणाली की, 'कोण इतकं अज्ञानी असू शकतं? हा विशेषाधिकारांचा आवाज आहे. ती स्वत: सर्वसामान्य जणतेपेक्षा किती वेगळी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे विशालने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. 



तो पुढे म्हणाला, प्रत्येक भारतीय नागरिक हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कर भरतो. तसेच कोणताही व्यवहार करताना जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे श्रीमंतांनी आपण फार वेगळे आहोत असं दाखवण्याची गरज नसल्याचे सांगत त्याने कंगनाला सुनावले. 


कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. यावेळेस देखील तिचा अंदाज असाच होता. फक्त ३-४ टक्के जनताच कर देते. इतर सारे त्याच करावर अवलंबून असतात, असं सांगत निदर्शनांदरम्यान होणाऱ्या जाळपोळीचा तिने निषेध केला.


एकिकडे भूकबळी जात असताना दुसरीकडे अशा ७०-८० लाख रुपये किंमतीच्या बसची जाळपोळ केली जाणं योग्य नसल्याचा मुद्दा तिने मांडला. कंगनाने अतिशय थेट शब्दांमध्ये तिचं मत मांडत या मुद्द्यावर तिचा मुद्दा सर्वांपुढे ठेवला. मुळात याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, असं म्हणत तिने आपलं बोलणं आवरतं घेतलं.