मुंबईः यंदाच्या वर्षातला सर्वात हिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'द कश्मीर फाइल्स'. या सिनेमाची देशभर चर्चा झाली तसंच अनेक सिनेमांचे रेकॉर्डही मोडले. आता हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी विकिपीडियावर संताप व्यक्त केला आहे. विकिपीडियावरील त्याच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल ते संतापले आहेत. विकिपीडियावर या सिनेमाची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये 'काश्मीर फाइल्स' खोट्या आणि काल्पनिक कथेवर आधारित असल्याचं वर्णन करण्यात आले आहे. हा तपशील पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ट्विट करून आपला राग विकिपीडियावर व्यक्त केला आहे.



 तुम्ही 'द काश्मीर फाइल्स' हा 2022 सालातील सर्वात यशस्वी चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या विषयाबद्दल खूप बोलले आहेत. त्यांनी अनेकवेळा द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तरही दिले आहे. आता अग्निहोत्री यांनी विकिपीडियावर तोंडसुख घेतले आहे.



विकिपीडियावर काश्मीर फाइल्सच्या वर्णनाचा स्क्रीनशॉट शेअर करताना, विवेक अग्निहोत्री लिहितात, 'प्रिय विकिपीडिया, तुम्ही तपशीलात 'इस्लामफोबिया प्रोपगंडा संघी इ.' जोडण्यास विसरलात. तुम्ही तुमच्या सेक्युलर क्रेडेन्शियल्समध्ये अपयशी ठरत आहात. त्वरा करा, पुढे संपादित करा.'



'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना हा सिनेमा चांगलाच आवडला होता. कथेपासून ते अभिनेत्यांच्या उत्तम अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींची प्रशंसा झाली.