नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये एका बाजूला जिथे अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तिथे दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार अजीत कुमारचा तामीळ सिनेमा 'विवेगम' देखील अगदी बक्कळ कमाई करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात विवेक ओबेरॉयने खलनायकाची भूमिका साकारली आहे. आणि याचमुळे विवेक ओबेरॉय गेल्या काही दिवसांमुळे चर्चेत आहे. हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी जगभरात रिलीज झाला आहे. सिनेमांत अजीत आणि विवेक यांच्यासोबत काजल अग्रवाल आणि कलम हासनची मुलगी अक्षरा हासनदेखील आहे. या सिनेमाला शिवाने दिग्दर्शित केलं आहे. 


रेकॉर्ड तोड केली कमाई : 
चैन्नई बॉक्स ऑफिसवर 'विवेगम' या सिनेमाने पहिल्याच आठवड्यातच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. सिनेमाने शनिवारपर्यंत ६७.९२ कोटी असा जबरदस्त गल्ला कमावला आहे. हा सिनेमा चैन्नईतील या वर्षातील विकेंडला सर्वाधिक चालणारी फिल्म ठरली आहे. पहिल्या आठवड्यात ५.७५ कोटीची कमाई केली आहे. 'विवेगम' ही सर्वाधिक ब्लॉकबस्टर हिट असणारा सिनेमा ठरणार आहे. ओपनिंग डे कलेक्शन २५.८३ करोड रूपये इतके आहे. ओवरसीज मार्केटमध्ये तीन दिवसाची कमाई १८ करोड इतकी झाली आहे. आतापर्यंत या सिनेमाने ६८ करोडांचा आकडा पार केला आहे. 


'विवेगम' चे वॉरमधून बाहुबली २ देखील वाचू शकला नाही : 
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमांची लोकप्रियता एवढी आहे की सिनेमा करोडोंच्या घरात गल्ला करतात. ब्लॉकबस्टर सिनेमा बाहुबली २ 'विवेगम' च्या फटक्यातून वाचू शकलेला नाही. अजीतच्या सिनेमाने बाहुबली २ चा रेकॉर्ड तोडला आहे. 


विवेकने आपल्या फॅन्सना नाराज केलं नाही 
दिग्दर्शक शिवाला खलनायकाच्या भूमिकेसाठी एक पॉवरफुल अभिनेता हवा होता. आणि त्याला असं वाटतं होतं की, विवेक ओबेरॉय याला न्याय देऊ शकतो. आणि विवेकने आपल्या फॅन्सना नाराज केलं नाही.