Video : ब्रिटिश संसदेसमोर विवेक ओबेरॉयने फडकावला तिरंगा; म्हणाला, `एक काळ होता जेव्हा आपण...`
स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता विवेक ओबेरॉय ब्रिटनमध्ये पोहोचला आहे
Independence Day 2022 : देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन (75th Independence Day) भारतासह जगभरातही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. देशातील प्रत्येकाने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. प्रत्येकाने आपापल्या शैलीत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला आहे. बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेटपटूंनीही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला आहे.
पण या स्वातंत्र्यदिनानिमित्त अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) ब्रिटनमध्ये पोहोचला. विवेक ओबेरॉयने ब्रिटिश संसदेसमोर (British Parliament) तिरंगा फडकवत स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला आहे. विवेक ओबेरॉयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो ब्रिटिश संसदेबाहेर उभा असल्याचे दिसत आहे.
"एक काळ असा होता जेव्हा आपण भारतातच आपला झेंडा फडकावू शकत नव्हतो आणि आज प्रत्येक भारतीय आपल्या शहीदांच्या हौतात्म्यामुळे जगातील कोणत्याही देशात तिरंगा अभिमानाने फडकवू शकतो," असे विविके ओबोरॉयने म्हटले आहे.
या व्हिडिओमध्ये विवेक ओबेरॉय त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत दिसत आहे. विवेक ओबेरॉयचे कुटुंब ब्रिटनमध्ये अभिमानाने हातात तिरंगा घेऊन फडकावत आहेत.
दरम्यान, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेद्वारे प्रत्येक घरात तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते आहे. या मोहिमेला पाठिंबा देत बॉलिवूड कलाकारांनी हा स्वातंत्र्याचा सण मोठ्या थाटामाटात केला आहे. अभिनेता वरुण धवन, सलमान खान, सिद्धार्ध मल्होत्रा, क्रिती सेनननं 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठिंबा देत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं प्रोफाइल बदललं आहे. तर दुसरीकडे अनिल कपूर, अक्षय कुमार, अजय देवगणनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटचं प्रोफाइल बदललं आहे.
तर बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने त्याच्या घरावर तिंरगा फडकवत फोटो शेअर केला.