मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सरचे निदान झाले आणि संपूर्ण बॉलिवूड हादरुन गेलं. त्याचबरोबर सोनालीच्या चाहत्यांसाठी देखील जबर धक्का बसला. न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिच्या या कठीण प्रसंगात तिच्यासोबत तिचा पती गोल्डी बेहेल, मुलगा रणवीर खंबीरपणे तिची साथ देत आहेत. तर मित्रपरिवार, चाहत्यांच्याही शुभेच्छा तिला मिळत आहेत. याचदरम्यान सोनालीच्या आठवणीत अभिनेता विवेक ओबेरॉय देखील अश्रू अनावर झाले.


...म्हणून विवेकचे डोळे पाणावले!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या रियालिटी शोमध्ये एका स्पर्धकाने कॅन्सर पेशन्टच्या भूमिकेत सादरीकरण केले. ते पाहुन विवेकला अश्रू अनावर झाले. यापूर्वी सोनाली बेंद्रे टीव्ही शो 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' जज करत होती. शो चे काही एपिसोड शूट केल्यानंतर सोनालीने हा शो अचानक सोडून दिला आणि उपचारांसाठी न्युयॉर्कला रवाना झाली. स्पर्धकाचा परफॉर्मन्स जबरदस्त होता. कॅन्सरग्रस्त स्पर्धक कॅन्सरवर कसा विजय मिळवतो, हे त्यात दाखवण्यात आले होते. हे सादरीकरण पाहुन विवेकला अश्रू अनावर झाले.



विवेक-सोनालीची मैत्री


या शो च्या पहिल्या सीजनमध्ये सोनाली-विवेकमध्ये चांगली मैत्री झाली होती. पण कॅन्सरवरील उपचारांसाठी सोनाली न्युयॉर्कला गेल्याने विवेक तिला खूप मिस करत आहे.