मुंबई : हल्ली वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. बाजारात यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनेही आलीत. मात्र हे वजन कमी करणे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. अशीच घटना एका अभिनेत्याच्या बाबतीत घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात विवेक शौक या अभिनेत्याने आपला जीव गमावलाय. उल्टा-पुल्टा' आणि 'फ्लॉप शो' मधून त्यांनी प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. 


३ जानेवारी २०११ ला त्यांनी वजन कमी करण्यासाठीचे ऑपरेशन केले होते. मात्र ऑपरेशननंतर सात दिवसांतच म्हणजे १० जानेवारी २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. 


गदरमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती. त्यांनी बरसात की रात या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. ऐतराज या सिनेमात त्यांनी अक्षय कुमारच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय, लाईफ पार्टनर, क्रेझी ४, रकीब, जमीर, किसना, दम, २३ मार्च १९३१ शहीद या सारख्या सिनेमातही त्यांनी काम केले होते.