Vivian Dsena Ex Wife Vahbiz Dorabjee : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता विवियन डीसेना सध्या वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 18’ मध्ये आहेत. त्यात एकीकडे ते त्याचा गेम खेळत आहेत तर दुसरीकडे प्रेक्षकांना त्याचा गेम खूप आवडतोय. या शोमध्ये प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी त्याच्या खासगी आयुष्यावर चर्चा करताना दिसतो. असचं काहीसं विवियन डीसेना यानेही केलं आहे. या शोमध्ये विवियन डीसेना हा शिल्पा शिरोडकरसोबत बसून त्याच्या खासगी आयुष्यावर चर्चा करताना दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवियननं त्याची पत्नी नूरान अलीसोबत त्यांची लव स्टोरी आणि पूर्वाश्रमीची पत्नी वाहबिज संबंधीत काही किस्से सांगितले आहेत. तर आता विवियनची पूर्वाश्रमीची पत्नी वाहबिजनं देखील एका मुलाखतीत घटस्फोटाविषयी वक्तव्य केलं आहे. त्यासोबत हे देखील सांगितलं की कशा प्रकारे तिला अभिनेत्यापासून वेगळं झाल्यानंतर लोकांची बोलणी आणि टोमणे ऐकावे लागले होते. 


वाहबिजनं ही मुलाखत 'बॉलिवूड बबल'ला दिली आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावेळी अनेक गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की विवियन डीसेनाशी घटस्फोट घेतल्यानंतर लोकांनी तिला घटस्फोटित असल्याचं म्हणायचे. इतकंच नाही तर, लोकांनी तिच्याविषयी एक मत तयार केलं होतं. या गोष्टीवरून अभिनेत्रीवर खूप खोलवर परिणाम केला होता. त्यानंतर जेव्हा तिला विचारण्यात आलं की कोणत्या रिअॅलिटी शोचा भाग होण्यावर विचारण्यात आलं. तर त्यावर ती म्हणाली की ती रिअॅलिटी शोसाठी योग्य असेल अशी व्यक्ती नाही. ती एक अभिनेत्री आणि त्यामुळे रिअॅलिटी शो पासून स्वत: ला लांब ठेवलं आहे. त्यानंतर जेव्हा वाहबिजला जेव्हा विचारण्यात आलं की काय त्याला यावेळी बिग बॉसची ऑफर मिळाली होती. तर तिनं याला नकार दिला.


हेही वाचा : एकता कपूर आणि आई शोभा कपूर कायद्याच्या कचाट्यात, काय आहे प्रकरण?


वाहबिजनं सांगितलं की 'त्यांना या वर्षाची मिळाली नव्हती, पण आधीच्या अनेक सीजनची ऑफर मिळाली होती आणि आता तर मी स्टार प्लसचा शो करत होती, त्यामुळे बिग बॉसमध्ये तसही येऊ शकत नाही. वाहबिजनुसार, बिग बॉस सगळ्यात चॅलेंजिंक शो आहे आणि ती घाबरते. हेच कारण आहे की त्यानं आजवर त्यासाठी होकार दिलेला नाही. दरम्यान, विवियन आणि वाहबिज यांनी 2013 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या 8 वर्षांनंतर ते विभक्त झाले.'