मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक हिट्स गाणे देणारे संगीतकार वाजिद खान यांची अचानक सोमवारी रात्री तब्बेत बिघडल्यामध्ये रूग्णालयात दाखल केलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना तात्काळ ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे. 


स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी वाजिद यांच्या हृदयात ब्लॉक असल्याचं सांगितलं. तात्काळ उपचाराची आवश्यकता असल्यामुळे त्यांना ICU भर्ती करण्यात आलं. यावेळी वाजिद यांच्यासोबत लहान भाऊ साजिद आणि कुटुंबातील इतर लोकं देखील होती. 
 
वाजिद यांच्या एका धमनी 100 टक्के ब्लॉक असल्याच सांगण्यात आलं आहे. तर दुसऱ्या धमनीमध्ये 90 टक्के ब्लॉकेज असल्याचं समजलं आहे. यामुळे डॉक्टरांनी तात्काळ एंजिओप्लास्टी केली आहे. वाजिद यांनी साजिद सोबत बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहे. दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये साजिद - वाजिद नावाने लोकप्रिय आहे. साजिद वाजिद ही जोडी दबंग सलमान खानची आवडती जोडी आहे. या जोडीने सलमानच्या 'वॉन्टेड', 'मुझसे शादी करोगी', 'एक था टायगर', 'दबंग' या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहे.