मुंबई : 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीत लग्न झाल्यानंतर दीपिका आणि रणवीर सिंहने 4 रिसेप्शन दिले. यातील शेवटच आणि सगळ्यात खास असलेलं रिसेप्शन शनिवारी मुंबईत पार पडलं. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या रिसेप्शनमध्ये बच्चन कुटुंबिय देखील सहभागी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच कलाकारांप्रमाणे बच्चन कुटुंबियांनी देखील ही पार्टी खूप एन्जॉय केली. मात्र पार्टीत अभिनेत्री ऐश्वर्या रायला एका फजितीला सामोरं जावं लागलं. तेव्हा तिला तिची नणंद श्वेता बच्चनने सांभाळलं अन्यथा तिच्यावर वाईट प्रसंग आला असता. ऐश्वर्या राच बच्चन कोणत्या तरी मोठ्या गोष्टीला धक्का लागून खाली पडणार होती. तेवढ्यातच तिला श्वेता बच्चनने सांभाळलं. 



दीपवीरचं रिसेप्शन हे मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये शनिवारी अगदी ऐश्वर्यात पार पडलं. अगदी उशिरा पर्यंत चालणाऱ्या या रिसेप्शनची सांगता अगदी सकाळीच झाली. लग्नाचा हा चौथा आणि शेवटचा प्रोग्राम होता. तेव्हा बॉलिवूडच्या अनेक गोष्टी समोर आल्या ज्याची जोरदार चर्चा होऊ शकते. 



रिसेप्शन पार्टीत सगळ्यांना मात देत ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी डान्स फ्लोर गाजवला. 'जुम्मा चुम्मा दे दे' या गाण्यावर मनमुराद डान्स केला. अमिताभ बच्चन यांनी या गाण्यावर ठेका धरला त्यावेळी तिथे रेखा देखील उपस्थित होती.