मुंबई : राजकुमार हिरानी यांचा सिनेमा 'संजू' लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होतोय. या सिनेमातील गाणी आणि ट्रेलर लोकांच्या पसंतीस उतरलाय. ट्रेलरमध्ये रणबीचा अभिनयही दर्शकांना आवडलाय. २० जून २०१८ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे... यापूर्वीच या सिनेमाचा आणखी एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. हा 'मुन्नाभाई' सिनेमातील एक भाग आहे... १९ सेकंदाच्या या व्हिडिओत रणबीर संपूर्ण संजय दत्तसारखाच दिसतोय. या व्हिडिओमध्ये 'मुन्नाभाई एमबीबीएस'चं एक दृश्य चित्रीत करण्यात आलंय. परंतु, या दृश्यात संजय दत्तच्याऐवजी रणबीर कपूर दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. २१ जून रोजी युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलेला व्हिडिओ आत्तापर्यंत ७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. 


दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार, 'संजू' या सिनेमात संजय दत्त याच्याबद्दल काही रोमांचक आणि आत्तापर्यंत फारच खाजगी राहिलेल्या काही घटना समोर येणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. हा ट्रेलरही प्रेक्षकांना आवडलाय... त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढलीय.