Prithvik Pratap Prajakta Mali Viral Reel: साचेबद्द मालिकांना बगल देत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले फारच कमी कार्यक्रम दिर्घकाळ तग धरुन राहतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! कोरोना काळातही महाराष्ट्राळा खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी लोकल ट्रेनपासून ते रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेसबस्टर म्हणून या कार्यक्रमातील स्कीट्स पाहिली जातात. सोशल मीडियावरही या कार्यक्रमातील व्हिडीओ, संवाद आणि पात्रांची चांगलीच चर्चा असते. या कार्यक्रमाने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या लोकप्रियतेचा फायदा कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांनाही झाला आहे. या कार्यक्रमातील समालोचक प्राजक्ता माळीपासून ते प्रत्यक्षात स्कीटमध्ये काम करणारे वणीता खरात, गौरव मोरे, प्रियदर्शनी इंदिलकर, दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे यासारख्या बऱ्याच कलाकारांना प्रचंड फॉलोअर्स या कार्यक्रमाने मिळवून दिले. सोशल मीडियावरही त्यांच्या पोस्टवर कार्यक्रमाचा संदर्भ देत कमेंट्सचा पाऊस पडत असतो. हे कलाकार अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या पृथ्वीक प्रतापचा असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.


पृथ्वीकला होकार दिला की काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाची स्टारकास्ट सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सोशल मीडियावर या दौऱ्यादरम्यान अनेक कलाकार फोटो, व्हिडीओ आणि इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट आहेत. अगदी मजेशीर व्हिडीओंपासून ते नेमकी कुठे भटंती सुरु आहे यासंदर्भातील पोस्ट कलाकार करत असतात. पृथ्वीक प्रतापने केलेल्या अशाच एका पोस्टवरुन अगदी प्राजक्ता माळीने त्याला होकार दिलाय की काय अशी शंका चाहत्यांना आली आहे. पृथ्वीक प्रतापने त्याच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये तो फुटपाथवरुन चालताना दिसत आहे. करड्या रंगाचं जॅकेट, पिवळं शर्ट आणि डेनिम अशा लूकमध्ये पृथ्वीक फारच हॅण्डसम दिसत आहे. या व्हिडीओला शाहरुख खान आणि जुही चावलाच्या 'यस बॉस' चित्रपटातील 'मै कोई ऐसा गीत गाऊ' गाणं वापरण्यात आलं आहे.


व्हिडीओमध्ये काय आहे?


पृथ्वीक चालत असतानाच अचानक प्राजक्ता माळी व्हिडीओ फ्रेममध्ये एन्ट्री करते आणि त्याचा हात धरुन चालू लागते. प्राजक्ताने वन पीस परिधान केला असून हातात लाल रंगाची छोटी पर्स पकडली आहे. हातात हात घालून दोघे एकमेकांशी हसत गप्पा मारताना चालताना दिसत आहेत. या व्हिडीओला पृथ्वीकने मजेदार कॅप्शन दिली आहे. "रिल शूट करताना प्राजक्ता माळीजी मध्येच आल्या" अशा अर्थाची कॅप्शन त्याने दिली आहे.



काळजावर बुलडोझर चालवला


या रिलवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. 'मला फक्त त्रास होतोय रील पाहिल्यापासून' असं एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने पृथ्वीकला 'फायनली तुला हो बोलली वाटतं,' असं म्हटलं आहे. एका चाहत्याने, 'एक पॅकेट फरसाण गिफ्ट म्हणून दिल्यावर प्राजक्ता' अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका चाहत्याने 'पृथ्वीक असं नको वागायला हवं होतं तू' असं म्हटलंय. एकाने तर थेट 'काळजावर बुलडोझर चालवला,' अशी कमेंट केली आहे.


नक्की वाचा >> 'त्या' फोटोमुळे चहलच्या संसारात मीठाचा खडा? भावनिक होत धनश्री म्हणाली, 'तुमच्या आई, बहिण..'



3 दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या रिलला 1 लाख 59 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.