मुंबई : रणवीर सिंहचा आगामी सिनेमा '83'चं शुटिंग नुकतंच संपल आहे. सोमवारी या सिनेमाची रॅपअप पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रॅपअप पार्टीला सिनेमाचे सगळे कलाकार उपस्थित होते. त्याचप्रमाणे या पार्टीत रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी देखील खूप एन्जॉय करून डान्स केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी दोघांनी क्रिकेट खेळण्याची देखील ऍक्टिंग केली आहे. कपल्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रणवीर सिंह या पार्टीत फूल मूडमध्ये दिसला. रणवीरने सिंबाच्या 'लडकी आँख मारे' वर डान्स केला आहे.  सोशल मीडियावर रणवीर सिंहचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


व्हिडिओमध्ये रणवीर काऊंटरवर उभा राहून डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ बघून लक्षात येतं की, रणवीर सिंह ट्रू रॉकस्टार आहे. यासोबतच रणवीर सिंह पत्नी आणि अभिनेत्री दीपिकासोबत डान्स करताना दिसत आहे. पार्टीत सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान देखील आपल्या पत्नीसोबत मिनी माथुर देखील होते. 



83 हा सिनेमा माजी क्रिकेटर आणि कॅप्टन कपिल देव यांच्यावर आधारित आहे. तसेच दीपिका या सिनेमात देखील पत्नीची भूमिका साकारत आहे. सिनेमात दीपिकाचा रोल खूप छोटा असला तरीही खूप खास आहे. साजिद नाडियाडवाला या सिनेमाची निर्मिती करत आहे. हा सिनेमा 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. '83' हा सिनेमा वर्ल्ड कप क्रिकेट 1983 वर भाष्य करणारा आहे. हरियाणातील एका तरूणाची गोष्ट या सिनेमात आहे. ज्याने 1983 मध्ये लंडन येथे लॉर्ड्स स्टेडिअमवर वर्ल्ड कप जिंकला होता.