मुंबई : आमिर खानच्या ‘दंगल’मधून घराघरात पोहोचलेल्या फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत सान्या आणि फातिमा एका इंग्रजी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. त्यांना ‘दंगल’मध्ये कुस्ती खेळताना पाहण्यात आले होते त्यामुळे त्यांचा हा वेगळा अंदाज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. 


हॉट डान्सची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सान्या आणि फातिमाचा हा हॉट मुव्ह असलेल्या डान्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यातल्या त्यात दोघींना एकत्र डान्स न थांबता डान्स करताना बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे. दोघीही डान्सची सुरूवात करतात पण फातिमा काही वेळाने थांबते पण सान्या आपल्या धमाकेदार मुव्ह्सने सर्वांना चकीत केले आहे. 



कोरिओग्राफर सान्या


सान्या एक अभिनेत्री असण्यासोबतच एक डान्सर म्हणूनही लोकप्रिय आहे. इतकेच काय तर सान्याने आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमात एका गाणं कोरिओग्राफही केलं आहे. तर फातिमा ही आमिरच्या आगामी ‘ठग्स ‘ओफ हिंदोस्तान’मध्येही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.