COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : रवी किशन प्रोडक्शन बॅनरच्या अंतर्गत 'सनकी दरोगा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच दिग्दर्शन सैफ किदवई असून निर्माता स्वतः रवी किशन आहे. भोजपुरी सिनेमांचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवी किशनच्या या सिनेमाबाबत प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. टीझर बघून असं कळतं की, हा सिनेमा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करतो. सिनेमाचं मुख्य केंद्र हे बलात्कार आणि हा शाप नष्ट करण्यासाठी रवी किशन या सिनेमांत रूद्र रूप धारण करतो. 


हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून भरपूर अॅक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनकी दरोगा या सिनेमांत रवी किशन रॉबिनहूड अवतारात दिसत आहे. कायम रवी किशन भोजपुरी सिनेमाला पुढे घेऊन जाण्यात प्रयत्नशील असतो त्याचा हा प्रयत्न देखील कौतुकास्पद आहे.