Horror Movies List: सध्या वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट आपल्याला प्रेक्षक म्हणून पसंतीस पडताना आपल्याला दिसतात. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे हॉरर चित्रपटांची. हॉरर चित्रपट पाहण्यासाठी आपल्यालाही कुठल्यातरी योग्य वेळेची गरज असतेच आणि सोबतच कुणाची तरी साथ लागतेच लागते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे विकेंडला आपण कुठले असे हॉरर चित्रपट पाहू शकतो याची. आपल्या हॉलिवूडचे असे अनेक पर्याय हे भेटू शकतात त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की हे चित्रपट फक्त आपले मनोरंजनच करतील. सध्या तुम्ही काही जूने चित्रपटही पाहू शकता परंतु जर का तुम्हालाही आताच्या जेनरेशनचे काही चित्रपट पाहायची इच्छा असेल तर तुमच्याकडेही मोठी लिस्ट आहे तेव्हा चला तर मग पाहुया की या लिस्टमध्ये नक्की कोणत्या चित्रपटांची नावं आहेत आणि हे चित्रपट नक्की तुमचे कसे मनोरंजन करतील?


1. इंसिडियस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट 2010 साली आला होता आणि तेव्हा हा चित्रपटही तूफान गाजला होता. खासकरून तरूणाईला या चित्रपटानं वेड लावलं होतं. हा चित्रपट एक सुपरनॅचरल थ्रिलर आहे. तेव्हा या चित्रपटाचीही तुम्हाला चांगलीच पर्वणी आहे. यावेळही तुम्हाला भूताच्या हटके गोष्टी पाहायला मिळतील. 



2. द कॉनज्यूरिंग


हा 2013 साली आलेला एक हटके चित्रपट आहे. या भूताटकी तर आहेच परंतु यात अनेक रहस्यही दडली आहेत. तेव्हा चला तर मग पाहुया की यावेळी तुम्ही या चित्रपटातून नक्की काय पाहु शकता. परंतु तुम्हाला जर का हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्हीही हा चित्रपट एकट्यानंही पाहू शकता परंतु त्यासाठी तुम्हालाही योग्य ती काळजी घ्यावी लागेल. या चित्रपटाचे पुढील दोन भागही पाहण्यासारखे आहेत. 



3. शायनिंग 


1980 सालातला हा चित्रपट आहे. जो त्यावेळीही तूफान गाजला होता आणि आताही हा चित्रपट तुम्ही कधीही पाहू शकता. यातूनही तुम्हाला सुपर हॉरर चित्रपटाचा फिल येईल परंतु हा चित्रपट एकट्यानं अजिबातच पाहू नका. 



4. द एक्ससॉरिस्ट 


हा चित्रपटही तुम्हाला पाश्चिमात्त्य हॉरर मुव्हीचा फिल देतो. तुम्हाला मिस्ट्री आणि त्यासंबंधीचे हॉरर मुव्हीज पाहायचे असतील तर तुम्ही हे चित्रपट नक्कीच पाहू शकता. त्यातीलच हा एक चित्रपट आहे. हाही आपल्यासोबत कुणातरी खास व्यक्ती ठेवूनच पाहा.



5. द बॉय 


हा चित्रपट थोड्या वेगळ्या धाटणीचा आहे. यामध्ये तुम्हाला एक वेगळचं रहस्य पाहायला मिळेल. त्यातून बाहुल्यांचे हॉरर चित्रपट लोकांना पाहायला आवडतात. जसा की एनाबेल हा एक चित्रपट आहे तेव्हा तुम्हाला या चित्रपटांची चांगली पर्वणी आहे.