मुंबई :  Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून गेल्या काही दिवसांपासून देशभरात लॉकडाईन लागू करण्यात आलं आहे. ज्याचं पालन सर्वांनीच केल्याचं चित्र आहे. अत्यावश्य सेवा वगळता इतर अनेक व्यवहारही ठप्प आहेत. कलाविश्वातही सध्या अशीच शांतता आहे. पण, मुख्य व्यासपीठ शांत असलं तरीही त्यामागे मात्र बऱ्याच हालचाली सुरु आहेत. अर्थात सेलिब्रिटी मंडळींच्या खासगी आयुष्यात या होम क्वारंटाईनच्या काळात बरंच काही घडत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडिओ याचाच प्रत्यय देत आहे. शारीरिक स्वास्थ्यावर सुष्मिताने कायम भर दिला आहे. निरोगी शरीरासाठी ती सहसा योगसाधनेचा आधार घेताना दिसते. अशाच या अभिनेत्रीची योगसाधना पाहून तिचा प्रियकर अर्थात रोमन शॉलही भारावला आहे. 


सुष्मिताने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिचं लवचिक शरीर आणि योगसाधना पाहता यावर तिची पकड स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यातच तिने लिहिलेलं कॅप्शन म्हणजे या व्हिडिओला आणखी उठावदार ठरवत आहे. योगविद्येवर असणारी सुष्मिताची निष्ठा आणि तिची समर्पक वृत्ती पाहता तिचा प्रियकरही या व्हिडिओवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकलेला नाही. 


तिचं आपल्या आयुष्यात असणं हे भाग्यंच म्हणावं असा सूर आळवणारी, 'लकी मी' अशी कमेंट त्याने या व्हिडिओवर केली. त्याची ही कमेंट पाहता सुष्मिता आणि रोमनच्या प्रेमाचा हा योगायोग चाहत्यांची मनं जिंकत आहे हे खरं. 



 


इथे महत्त्वाची बाब म्हणजे अनेकदा सुष्मिताला योगासनांचा सराव करतेवेळी तिच्या प्रियकराचीही साथ मिळते. या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम, विश्वास आणि जीवनात एकमेकांना पावलोपावली साथ देण्याची वृत्ती पाहता ही सेलब्रिटी जोडी अनेकांसाठीच काही भन्नाट आदर्श प्रस्थापिक करत आहे.