VIDEO: प्रियंका चोप्राने रागाच्या भरात आपल्याच डोक्यात फोडला वाईनचा ग्लास
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली : अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन टीव्ही सीरिज 'क्वांटिको'च्या शूटमध्ये बिजी आहे. मात्र, शूटिंग करुन प्रियंका इतकी थकली आहे की तिने रागाच्या भरात वाईनचा ग्लासच आपल्या डोक्यावर मारला.
इतकचं नाही तर या संदर्भातील एक व्हिडिओही प्रियंकाने सोशल मीडियात शेअर केला आहे. प्रियंकाने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, 'जेव्हा तुम्ही नाईन ते वाईनपर्यंत काम करता तेव्हा असं काहीसं होतं... असं घरी करण्याचा प्रयत्न करु नका. मी एका वाईट दिवसानंतर असं करण्याचा निर्णय घेतला...
प्रियंकाने रागाच्या भरात वाईनचा ग्लास आपल्या डोक्यात वाईनचा ग्लास फोडते. मात्र, प्रियंकाने हा व्हि़डिओ मस्करीत शेअर केला आहे. हा व्हिडिओ ब्रेकअवे ग्लासने बनवला आहे. ब्रेकअवे ग्लासला शुगर ग्लास असंही म्हणतात. हा ग्लास ट्रान्सपरंट आणि नाजूक असतो जो तोडल्यानंतर इजाही होत नाही. अशा प्रकारच्या काचांचा उपयोग नेहमी सिनेमांत करण्यात येतो.
प्रियंका आपल्या शोच्या सेटवर नेहमीच मस्ती करताना पहायला मिळते. तसेच शूटच्या सेटवरचे फोटोजही प्रियंका सोशल मीडियात शेअर करत असते. या शो व्यतिरिक्त प्रियंका लवकरच हॉलिवूड सिनेमांत पहायला मिळणार आहे.