मुंबई : फोमो ही नवी वेबसीरिज ५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ६ भागांची असलेली ही वेब सीरिज प्रेक्षकांना शुद देसी मराठी या यूट्युब चॅनलवर पाहता येणार आहे. फोमो म्हणजे फियर ऑफ मिसिंग आऊट. एका लहान गावातून मोठ्या शहरात येणाऱ्या तरुणाला या शहरात सामावून घेण्यासाठी चाललेली धडपड यामध्ये दाखवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर (अभिषेक देशमुख) मुंबईत एका रेडियो चॅनलसाठी काम करायला आलेला असतो, पण २ वर्षांनंतरही त्याच्या ऑफिसमधलं कोणीच त्याला ओळखत नाही. त्यामुळे फोमोचं संकट त्याच्या मानगुटीवर बसतं. या फोमोतून सुटका करून घेण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. यानंतर अशाच फोमोने त्रस्त असलेल्या रेवती (पर्ण पेठे)शी त्याची ओळख होतो आणि गोष्टी बदलायला लागतात.


सुशांत धारवडकर आणि चिन्मय कुलकर्णी यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. पर्ण पेठे, अभिषेक देशमुख, रुचिता जाधव आणि चेतन चिटणीस हे या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. तसंच सागर कारंडे या वेबसीरिजमध्ये आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.