मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास या सेलिब्रिटी जोडीवर अनेक चाहत्यांचं प्रेम. काही दिवसांपूर्वीच या जोडीनं त्यांच्या नात्यात लेकिचंही स्वागत केलं. निक आणि प्रियांकाच्या नात्यात आनंदाची उधळण झालेली असतानाच आता त्यांच्या लग्नाला म्हणे एका बड्या सेलिब्रिटीनं बोल लावले आहेत. (Priyanka Chopra Nick Jonas)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच मेकिंगसाठी सेलिब्रिटी वर्तुळात ओळखल्या जाणाऱ्या सीमा तपारिया यांनी केलेल्या कमेंटमुळं एकच खळबळ माजली आहे. ‘इंडियन मॅचमेकिंग’च्या(Indian Matchmaking) दुसऱ्या पर्वाच्या निमित्तानं त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 


नेटफ्लिक्सवर Netflix वर प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमामध्ये सीमा त्यांच्याकडे येणाऱ्या विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगी स्थळं भेटवून देत त्यांचे सूत जुळवण्यात हातभार लावताना दिसतात. पण, यादरम्यानच त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र अनेकांनाच हैराण करणारी आहे. 


कार्यक्रमाच्या एका भागामध्ये सीमा यांनी वयाहून मोठ्या महिलांशी लग्न करण्याच्या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं. यावेळी त्यांनी प्रियांका चोप्रा (Priyanka chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या नात्याचं उदाहरण देत त्यांच्या वयांमध्ये असणारं अंतर जास्त आहे, हे योग्य नाही असं त्या म्हणाल्या. 


Client ला सल्ला देत आपल्याहून तीन वर्षांनी लहान मुलाशी लग्न न करण्याच्या मतावर सीमा ठाम दिसल्या. त्यादरम्यान, तिथं मुलीच्या आईनं प्रियांका आणि निकच्या वयामध्ये असणाऱ्या 10 वर्षांच्या अंतराचा उल्लेख केला. 



मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय. पण मला नाही वाटत त्यांची (निक आणि प्रियांका) जोडी योग्य आहे. त्यांनी लग्न केलंय खरं. पण ही जोडी योग्य नाही. प्रियांकासमोर निक बराच लहान वाटतो आणि ती त्याच्यापुढे मोठी वाटते.