मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या लग्नाची चर्चा ही फार आधीपासूनच सुरु होते आणि मग ही चर्चा कलाकारांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर आणखी दुपटीनं वाढते. आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींचे विवाहसोहळे तुम्हीआम्ही पाहिले. प्रत्येक सोहळा हा तितकाच लक्षवेधी आणि सुरेख असाच होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नसोहळ्यांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यातही नजरा खिळल्या त्या म्हणजे कलाकार आणि त्यांच्या जोडीदारांमधल्या काही रोमँटिक क्षणांवर. 


रणबीर- आलिया असो किंवा प्रियांका आणि निक. या आणि अशा कैक सेलिब्रिटींनी भर लग्नमंडपातच आपल्या जोडीदारांना Kiss करत त्या क्षणावर प्रेमाची मोहोर उमटवली. त्यांचा हा रोमँटिक अंदाज उपस्थितांना मात्र लाजवून गेला. 


रणबीर कपूर-आलिया भट्ट: लग्नाचे सर्व विधी आणि प्रथा परंपरा पूर्ण केल्यानंतर रणबीर आपल्या वधूला पाहताच तिच्यावर भाळला आणि आलियाला त्यानं सर्वांसमोरच Kiss केलं. (Ranbir Alia)



प्रियांका चोप्रा- निक जोनास : प्रेम व्यक्त करण्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास कधीच मागे नव्हते. पण, लग्नात मात्र त्यांच्या प्रेमाला उधाण आल्याचं दिसून आलं. लग्नातील बऱ्याच फोटोंमध्ये ही जोडी एकमेकांना Kiss करताना दिसली. (Priyanka chopra nick jonas)



विक्की कौशल-कतरीना कैफ : विकी कौशलही लग्नसोहळ्यांदरम्यान, कतरिनाचं सौंदर्य पाहून स्वत:ला थांबवू शकला नाही. त्यानं अगदी हळुवारपणे कतरिनाच्या कपाळावर Kiss केलं.  (Vicky kaushal katrina kaif )



फरहान अख्तर-शिबानी दांडेकर: फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचं नातं आणि त्यांचं लग्न हे कोणत्याही धार्मिक रुढीनुसार पार पडलं नाही. या दोघांनीही एकमेकांना जोडीदार म्हणून साथ देण्याची वचनं दिली आणि एकमेकांना Kiss केलं. (Farhan Akhtar shibani dandekar)



बिपाशा बासु-करण सिंग ग्रोवर : अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर यांना मंकी कपल म्हणूनही ओळखलं जातं. वयामध्ये बरंच अंतर असतानाही या दोघांनी प्रेमाचं नातं पुढे नेलं आणि लग्नाच्या दिवशी आपल्या रोमँटिक अंदाजाचा सर्वांनाच पाहता आला होता.