मराठी मालिका सध्या `लगीन घाई`च्या वळणावर
मराठी मालिकांमध्ये सध्या लग्नाचे सिझन ट्रेंडींग आहे.. सुमी आणि समरच्या लग्नानंतर आता आणखी कोणाचा बॅन्ड वाजतोय,
मुंबई : मराठी मालिकांमध्ये सध्या लग्नाचे सिझन ट्रेंडींग आहे.. सुमी आणि समरच्या लग्नानंतर आता आणखी कोणाचा बॅन्ड वाजतोय, ते पाहुयात. लग्न म्हटलं की लगबग आनंद, उत्साह आलाचं,पण त्याचबरोबर येतात ते रुसवे फुगवे... सध्या याचचं प्रतिबिंब मराठी मालिकांमध्येही उमटताना दिसतय. लग्नाचा हा ट्रेंन्ड सध्या छोट्या पडद्यावरही पहायला मिळतोय...
'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतील सुमी आणि समरचा विवाह सोहळा नुकताच धुमधडाक्यात पार पडला.. मी मिरवणार सगळ्यांची जिरवणा म्हण्णारी सुमी लग्नसोहळ्यातही थाटात मिरवत होती.
गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतेय ती 'माझ्या नवऱ्याची बायको 'मालिकेतील राधिकाच्या लग्नाची. नुकताचं सौमित्र आणि राधिकाचा साखरपुडा पार पडला... सध्याचा हा ट्रॅक पहाता लवकरचं ईथेही सनई चौघडे वाजण्याची शक्यता आहे.
ज्या मालिकेच्या नावातचं लग्न येतं ती मालिका म्हणजे 'लग्नाची वाईफ वेडींगची बायकू'... या मालिकेत मदनने नुकतचं गुपचुप एका विदेशी मुलीसोबत लग्न केलंय. लग्नाचा हा ड्रामा कसा पुढे रंगणार याकडेच चाहत्यांचं लक्ष आहे...
आता या पुढे मोहनच कसं होणार ? हाच प्रश्न 'भागो मोहन प्यारे' या मालिकेतील प्रेक्षकांना पडलाय. कारण ईथे चक्क भूतासोबत लग्नसोहळा पार पडणारेय बुवा...होय बरोबर ऐकताय तुम्ही...भागो मोहन प्यारे मालिकेत आता मोहनचं लग्न चक्क हडळसोबत होणार आहे.
ईथे प्रेमाला वय नसतं अस म्हणत, 'अग्गबाई सासुबाई' हि मालिका सुरु झाली आणि अवघ्या काहिच वेळात प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली....इथला सिक्वेन्स थोडा हटके आहे बर का! शेफ अभिजीत आणि आसावरी लवकरचं लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे...कुलकर्णींच्या घरात सनई चौघडे लवकरचं वाजतील यात काही शंकाचं नाही....
त्यामुळे आता तुळशीच्या लग्नापाठोपाठ मराठी मालिकांमध्ये सुद्धा लग्नसोहळे पार पडणारेत...मराठी मालिकां सध्या लगीन घाईच्या वळणावर आहेत.