मुंबई : सगळ्यात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक उर्फी जावेद बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. टीव्ही स्टार असण्याबरोबरच, उर्फी सोशल मीडियाच्या जगात एक मोठं नाव आहे. उर्फी सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्सद्वारे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत राहिली आहे, मात्र यावेळी तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती मरून रंगाचा ड्रेस घालून डान्स करताना दिसत आहे. नुकताच शेअर केलेला हा व्हिडिओ इंस्टावर आतापर्यंत 16 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. उर्फीच्या व्हिडीओवर कमेंट करून चाहते तिची सतत स्तुती करताना दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिने 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात खूप घमाल केली. उर्फी तिच्या बोल्ड आणि फॅशन सेन्समुळे घरावर राज्य करत होती. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत असते. कायम कोणत्या ना कोणत्या ड्रेसमुळे ती ट्रोलही होते. अलीकडे, उर्फी जावेद तिच्या बॅकलेस ड्रेसवरमुळे देखील ट्रोल झाली होती.