मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सेशन न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. दोन दिवस जोधपूर न्यायालयात असलेल्या सलमान खानची अखेर 50 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.  


बॉलिवूड आणि चाहते सलमानच्या पाठीशी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवले असले तरीही त्याचे चाहते आणि बॉलिवूड सलमान खानच्या पाठिशी ठाम उभे आहेत. सलमान खान जामिनावर सुटल्यावर कॅटरिना कैफ, मलायका अरोरा, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडिस अशा अनेक सेलिब्रिटींनी त्याची भेट घेतली. 


चाहत्यांना अभिवादन 


सलमान खानची जामिनावर सुटका झाल्यानंतर जोधपूर सेंट्रल जेल, सलमान खानचे राहते घर आणि सोबतच जगभरातील त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. 


सलमान खानने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घराच्या गॅलेरीत येऊन चाहत्यांना अभिवादन केले. मात्र सलमान खान नमस्कारासोबतच त्याच्या एका खास शैलीमध्ये त्याच्या चाहत्यांना अभिवादन करतो. ते म्हणजे 'थ्री फिंगर जेस्चर' 


सलमान खान अनेकदा मधली तीन बोटं दाखवून त्याच्या चाहत्यांचे आभार मानतो.  



तीन बोटांच्या जेस्चरचा अर्थ काय?


आपल्यावर दाखवल्या जाणार्‍या प्रेमाचा आदर, त्याला नम्रतेने अभिवादन करण्यासाठी मिडल थ्री फिंगर्स दाखवले जातात. हॉलिवूड कादंबरी, 'हंगर गेम्स' हा हॉलिवूड सिनेमा आणि बॉलिवूडमध्येही 'मिडल थ्री फिंगर्स' ही मुद्रा खास लोकप्रिय झाली. 


 


सलमान खानच्या मुद्रेचा अर्थ काय ? 


सलमान खानच्या जय हो चित्रपटात सलमानने ही तीन बोटं दाखवण्याचं जेस्चर चाहत्यांसमोर आणलं. याचा चित्रपटात दाखवलेला संदर्भ म्हणजे,' मला धन्यवाद म्हणू नका. त्याऐवजी बाहेर जा, किमानतीन लोकांना मदत करा आणि त्यांनाही हा मदत पुढे करण्याची प्रेरणा द्या आणि त्यांना धन्यवाद म्हणा.. यामुळे जगा बदलायला मदत होईल.