शिवाली परबच्या चेहऱ्याला नेमकं काय झालं? VIDEO मुळे एकच चर्चा
Shivali Parab : शिवाली परबच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा रंगली आहे.
Shivali Parab : 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' हे आपण बऱ्याचदा ऐकतो. मात्र, तुम्ही कधी ऐकलं का की जन्माच्या वेळीच त्या व्यक्तीचं मरण ठरलं असतं तर त्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. जन्मा- मरणाच्या आणि नशिबाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा 'मंगला' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी 'मंगला' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. अॅसिड हल्ल्यामुळे एका अशा सुंदर गायिकेची वाईट परिस्थिती होते की त्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा अॅसिड अटॅक नेमका का? आणि यानंतर मंगलानं या संकटावर मात करत दिलेला लढा या चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे.
या चित्रपटाच्या टिझरमुळे हा हल्ला नेमका का झाला? हा हल्ला कोणी केला?, अशा अनेक प्रश्नांना फाटा फुटल्या आहेत. अशा या आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन 'मंगला' हा चित्रपट पुढील वर्षी 17 जानेवारी 2025 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब मार्फत या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये पाहिल्याप्रमाणे चेहऱ्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याची खूण सतावत आहे. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.
हेही वाचा : 'हात पँटच्या खिशात लपवून शूटिंग कर'; फटाके फोडताना हात भाजल्यानं बिग बींना दिग्दर्शकानं दिला सल्ला
'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या साकारली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही कथा सत्य घटनेवर आधारीत असून मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.