मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनय क्षेत्रात यशाचा तुरा रोवणाऱ्या जान्हवी कपूरला फिरायला देखील फार आवडतं. नुकताचं जान्हवी राजस्थानमध्ये फिरायला गेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिच्यासोबत तिचे काही क्रू मेंबर्स देखील होते. जान्हवीच्या राजस्थान ट्रीपचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये जान्हवी फार थकलेली दिसत आहे. जान्हवीला एवढा थकवा आला आहे, की तिने डोक्यावर हात ठेवला आहे. 



जान्हवीच्या या फोटोवर युजर्सच्या कमेंट आणि  लाईक करत आहेत. जान्हवीच्या राजस्थान ट्रीपचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जान्हवी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 


अभिनेत्री असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.