मुंबई : जेव्हा कतरिना कैफने विकी कौशलशी लग्न केलं तेव्हा या बातमीवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. लग्न होईपर्यंत कतरिनाने आपलं अफेअर मान्य केलं नाही.  लग्नानंतर विकी आणि कतरिना अनेकदा एकत्र स्पॉट झाले. याशिवाय ती नुकतीच कौशल कुटुंबासोबतही स्पॉट झाली आहे. मात्र तिच्या येण्याने कौशल कुटुंबात काय बदल झाले आहेत. याचा खुलासा अभिनेत्रीच्या दिराने म्हणजेच सनी कौशलने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीचे आगामी सिनेमा
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल सध्या त्याच्या आगामी 'हुड़दंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'हुड़दंग' हा चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थी आणि 90 च्या दशकात निर्माण झालेल्या जातीय वादावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी काल रिलीज केला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


सनी कौशलकडून कतरिनाचं कौतुक 
एका मुलाखतीमध्ये बोलताना, जेव्हा सनी कौशलला तिचा भाऊ विकी कौशलची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अभिनेता म्हणाला, 'ती खूप चांगली आहे. इतकंच नाही तर कतरिना ही एक सकारात्मक व्यक्ती आहे. कतरिना जेव्हापासून कुटुंबाचा भाग बनली आहे. तेव्हापासून घरात पॉजिटीव्ह एनर्जी निर्माण झाली आहे. कुटुंबात नवीन सदस्याची भर पडल्यानंतर चांगली भावना येते. अभिनेत्याने पुढे खुलासा केला आहे की, तो कतरिनाला याआधी अजिबात ओळखत नव्हता. 'पण शेवटी सगळी माणसंच आहेत.'