प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचा साखरपुडा तुटला? सोशल मीडियावरुन फोटो गायब
इशिताच्या सोशल मीडियावर रोका सेरेमनीचे फोटो गायब आहेत.
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात प्रियंका चोप्राने अचानक भारतात येऊन सगळ्यांना आश्चर्यचकीत केलं होतं. परंतु दुसऱ्याच दिवशी भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या रोका सेरेमनीचे फोटो शेअर करत प्रियंकाने घरी येणाऱ्या आनंदाची माहिती दिली होती. हे फोटो प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि त्याची गर्लफ्रेन्ड इशिता कुमारच्या साखरपुडयाचे फोटो शेअर केले होते. परंतु अचानक आता सिद्धार्थ आणि इशिता यांचं नातं तुटल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने भाऊ सिद्धार्थच्या लग्नात सामील होण्यासाठी भारतात आली होती. परंतु या लग्नाआधी इशिता कुमार आजारी पडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इशिताच्या शस्त्रक्रियेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
परंतु आता इशिताच्या सोशल मीडियावर रोका सेरेमनीचे फोटो गायब आहेत. त्यामुळे आता या दोघांच्या नात्यात दुरावा आला असून याचं नातं संपलं असल्याची चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर इशिताने सोशल मीडियावर 'नवीन सुरुवातीसाठी चियर्स' अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. या कॅप्शनमुळे तिने सारं काही मागे या नात्याचा शेवट केल्याचं म्हटलं जात आहे.
इशिताच्या आईनेही 'जुनं पुस्तक बंद करुन नवीन गोष्ट लिहिण्यास तयार हो' अशी कमेंट केली आहे. इशिताच्या वडिलांनी आम्ही तुझ्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. इशिताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिने शेअर केलेल्या फोटोवरही दोघांच्या ब्रेकअपच्या आशयाच्या कमेंटही पाहिल्या गेल्या होत्या. इशिताला भेटल्यानंतर लगेचच प्रियंका पुन्हा परदेशात गेल्याने हे नातं तुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.