मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींसोबतचं स्टारकिड्स आणि त्यांच्या रात्रभर रंगणाऱ्या पार्ट्या देखील तुफान चर्चेत असतात. सेलेब्ससोबतच त्यांची मुलंही पार्टी सेलिब्रेशन आणि मित्रांसोबत मग्न झालेली दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वीकेंडला सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान आणि सोहेल-सीमा यांचा मुलगा निर्वान खान रात्री उशिरा पार्टीसाठी जाताना स्पॉट झाली.  समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इब्राहिम आणि निर्वान खान त्यांच्या अनेक मित्रांसोबत दिसत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये अनेक सुंदर मुली देखील आहेत. यादरम्यान निर्वान आणि इब्राहिमचे मित्रही एकापेक्षा एक लूकमध्ये दिसले. इब्राहिम आणि निर्वानच्या मित्रांच्या हॉट लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इब्रीहान आणि निर्वान हे लहानपणापासून चांगले मित्र आहेत. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. इब्राहिम आणि निर्वान यांना मित्रांसोबत पार्टी करताना अनेकदा स्पॉट करण्यात आलं.  



दरम्यान, इब्राहिमला श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबत डिनर डेट आणि पार्टी करताना स्पॉट करण्यात आले, त्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.