जामीन नाकारला तर काय असतील सलमान पुढे पर्याय
सलमानला जर आज जामीन नाकारला तर मात्र...
जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जामीन मिळणार की नाही याचा निर्णय थोड्याच वेळात होईल. जर सलमान खानला आज जामीन नाही मिळाला तर त्याच्याकडे कोणते पर्याय असतील याचा विचार सलमानचे वकील करत आहेत. सलमानच्या वकिलांना आशा आहे की आज सलमानला जामीन मिळेल. दुसरीकडे जर सलमानला आज जामीन नाही मिळाला तर मग ते हाय कोर्टात धाव घेतील. आज शनिवार आहे. त्यामुळे जर आज जामीन नाही मिळाला तर सोमवारी सलमानच्या वकिलांना हायकोर्टात जावं लागेल. त्यामुळे आणखी २ दिवस सलमानला जेलमध्येच काढावे लागतील.
सलमानच्या बहिणी पोहोचल्या कोर्टात, बॉडीगार्डला मात्र पोलिसांनी अडवलं
या संपूर्ण प्रकरणात न्यायाधीशांची बदली झाल्याने थोडा सस्पेंस तयार झाला आहे. राज्यस्थानमधील ८७ न्यायाधीशांची बदली झाली आहे. न्यायाधीश जोशी यांची देखील बदली झाल्याने आता सुनावणी कोण करणार याबाबत ही सस्पेंस होता. पण कोर्ट उघडताच रवींद्र कुमार जोशी तेथे पोहोचले. यावेळी सलमान खानला दोषी ठरवणारे जज खत्री यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. सध्या जज रवींद्र जोशी हेच जामीनावर सुनावणी करतील.