Anant Ambani Radhika Merchant Wedding : अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्यात देश विदेशातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. मनोरंजन, राजकीय आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी लग्नाला उपस्थित राहत या जोडप्याला आशिर्वाद दिले. या लग्नात उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच आता एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत आणि राधिकाच्या लग्नात तैमूरच्या नॅनीने देखील हजेरी लावली होती. या  फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. असं म्हटलं जातं की तैमूरच्या नॅनीने अनंत लहान असाताना त्याला सांभाळलं होतं. त्यामुळे ललिता डिसिल्वा या नवविवाहित जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी आल्या होत्या. ललिता यांचे अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. अनंत आणि ललिता यांचं नातं खूप जुनं आहे. लहान असताना बराच वेळ अनंत  ललिता यांच्यासोबत असायचा. याच प्रेमाचा आदर राखत,  'अंबानी कुटुंबाने मला या अनंतच्या लग्नाचं निमंत्रण दिलं', असं ललिता यांनी सांगितलं.  


 



अनंतची काळजी घ्यायची ललिता
तैमूरला सांभाळणाऱ्या ललिता डिसिल्वा अनंतच्या बालपणी त्याची  काळजी घेत होत्या. त्यांनी त्याचा खूप प्रेमाने सांभाळ केला. अनंतच्या बालपणीचे फोटोही ललिता यांनी शेअर केले आहेत. गार्डनमध्ये फिरणाऱ्या छोट्या अनंतसोबत ललिता देखील या फोटोत दिसत आ्रहे. अनंतच्या लग्नातले फोटो पोस्ट करत ललिता म्हणतात, 'इतके वर्ष उलटूनही अंबानी कुटुंब मला अजूनही विसरलेलं नाही. ते अजूनही मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग समजातात'. 


 



अनंतच्या लग्नातील  ललिता यांचे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी याचा संबंध करीना कपूरशी लावला आहे. करीनाची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह यांचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूरच्या बऱ्याच फोटोंमध्ये ललिता दिसतात. ललिता ही तैमूर आणि जेह दोघांनाही सांभाळताना दिसल्या होत्या. याआधी अनंत आणि बऱ्याच स्टार किड्सना त्यांनी सांभाळलं आहे. सध्या ललिता साउथचा सुपरस्टार राम चरणच्या मुलीची काळजी घेत आहेत. ललिता सेलिब्रिटींच्या मुलांची काळजी घेण्याचं काम करतात. अनंतच्या लग्नानिमित्ताने आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि वरुण धवन या सगळ्यांसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल  झाले आहेत.