रणवीरच्या या फोटोमागचे रहस्य काय?
सतत मस्करीचा विषय़ ठरत असलेला रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे..आणि याला कारण ठरले आहेत रणवीरचे हे फोटो.
मुंबई : आपल्या चित्र-विचित्र फॅशनने सतत मस्करीचा विषय़ ठरत असलेला रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे..आणि याला कारण ठरले आहेत रणवीरचे हे फोटो.
बाथटबमधील रणवीरचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत, असं काय झालं की रणवीरला असे फोटो काढावे लागले असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
रणवीर कधी आपल्या विचित्र फॅशनने तर कधी आपल्या बिंधास्त बोलण्यानं चर्चेत असतो.पण आता तर रणवीरनं सगळ्या मर्यादाच तोडल्या आहेत.
रणवीरचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताचं त्याच्यावर अनेक जोक्स लोकांनी करण्यास सुरुवात केली आहे.
कोणी म्हंणतयं की रणवीरचा बेफिक्रे फ्लॉप झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाये..तर कोणी म्हंणतयं की हा रणवीरचा नवा फॅशनेबल ड्रेस आहे जो दिसत नाही.
रणवीरचा हा फोटो खुप जुना आहे..त्यामुळे तो आता पुन्हा अचानक व्हायरल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पण रणवीरला या सगळ्या वादामुळे चिंतातूर होण्याची बिल्कूल गरज नाहीये..कारण त्याच्या फॅनफॉलोईंगमध्ये अजिबात घट झालेली नाही, त्यामुळेचं तर परदेशात असलेल्या प्रियांका चोप्रानेही रणवीरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आता प्रियांकासारखी इंटरनॅशनल स्टार रणवीरची फॅन आहे म्हंटल्यावर रणवीरला चिंता करण्याची बिल्कूल गरज नाहीय वेल आमचाही रणवीरला हाच सल्ला आहे की त्यानं या वादात न पडता नेहमीसारखं कुल राहावं..