मुंंबईः माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. पण तरीही त्यांच्या नात्यात प्रेम आहे. राम नेने यांच्यात असं काय आहे की, माधुरीने अनेक मोठ्या कलाकारांऐवजी नेने यांची निवड केली. राम नेने perfect husband आहेत यात काही वाद नाही..तर जाणून घेऊयात की कसं आहे त्यांचं नातं..



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरी आणि श्रीराम दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप व्यस्त असले तरी ते एकत्र वेळ घालवतात. दोघे अनेकदा कुटुंबासोबत सुट्टीवर जातात. त्यांच्या डिनर डेटची एक झलक माधुरी दीक्षितच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळते. कोणतेही नाते घट्ट करण्यासाठी एकमेकांना वेळ देणं खूप महत्वाचे आहे. तुम्हालाही उत्तम पती व्हायचे असेल तर तुमच्या पत्नी आणि कुटुंबासोबत नक्कीच वेळ घालवा.



माधुरी दीक्षितचा पती प्रेम व्यक्त करण्यापासून कधीच मागे हटत नाही. असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा राम नेने यांनी इन्स्टाग्रामवर माधुरी दीक्षितवर प्रेम व्यक्त केलंय. छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही तुम्ही तुमच्या नात्यातील प्रेम टिकवून ठेवू शकता.


बायको सेलिब्रिटी असो की सामान्य महिला, त्यांना आनंद देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न पुरेसा आहे. जगासमोर प्रेम व्यक्त करण्यासारखे. तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता ते वेळोवेळी दाखवा.



आपल्याला माहित आहे की, लग्नानंतर माधुरीने करिअर सोडून कौटुंबिक जीवनावर लक्ष दिलं. त्याच वेळी जेव्हा माधुरी दीक्षित पुन्हा इंडस्ट्रीत कामावर आली तेव्हा तिच्या पतीने तिला साथ दिली.


त्यांनी कधीही माधुरीला कोणत्याही प्रोजेक्टवर काम करण्यास मनाई केली नाही. पत्नीच्या करिअरसाठी त्यांनी केवळ अमेरिका सोडली नाही तर चित्रपटसृष्टीतील मंडळीही त्याला साथ देताना दिसत आहेत. परफेक्ट पती होण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीच्या करिअरलाही पाठिंबा द्यावा.


वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. ज्या नात्यात विश्वास नसतो ते नातं फार काळ टिकत नाही.