मुंबई : बॉलिवूडमध्ये कोणाचं सुत कधी कोणासोबत जुळेल हे सांगता येत नाही. अभिनेता रणबीर कपूरचं नाव अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि कतरिना कौफसोबत देखील जोडण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे त्याला प्रत्येक वेळी त्याच्या भूतकाळा संबंधी प्रश्न विचारण्यात येतात. शिवाय त्याची बहिण दीपिका पादुकोनला देखील भावाच्या नात्यांबद्दल विचारणा करण्यात येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात नुकताच झालेल्या मुलाखती दरम्यान करिनाला एक प्रश्न विचारण्यात आला. आलिया भट्ट, दीपिका पादुकोण आणि कतरीना कैफसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकल्यास करिना काय करेल? 'सर्वात आधी त्या लिफ्टमध्ये रणबीर आहे की नाही ते बघेल' प्रश्नाचे गंमतीत उत्तर देताना ती म्हणाली.



याआधी सुद्धा 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये देखील करिनाला असाच प्रश्न विचारण्यात आला होता. कतरीना कैफ आणि दीपिका पादुकोनसोबत करिना लिफ्टमध्ये अडकल्यास काय करेल? 'मी स्वत:ला मारून टाकेल.' असं उत्तर तिने दिलं होतं. 


सध्या रणबीर आणि आलियाच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. शिवाय दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचे समोर येत आहे. शिवाय हे प्रेमी युगूल 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.