रणबीर कपूरच्या बाळाचं नाव ऐकलंत का? स्वत: केला खुलासा
रणबीर कपूर सध्या पालक होण्याच्या बातमीने खूप चर्चेत आहे.
मुंबई : रणबीर कपूर सध्या पालक होण्याच्या बातमीने खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर चाहते रणबीर-आलियाला मम्मी पापा म्हणून ऐकण्यासाठी अधीर होत आहेत. तर खुद्द रणबीरही यावेळी खूप उत्साहित आहे. जणू काही त्याने आधीच खूप गोष्टींची आखणी केली होती. त्याने मुलाच्या जन्माच्या नावाचाही विचार सुरू केला आहे.
खरंतर, मीडिया संवादादरम्यान रणबीर कपूर अनेकदा त्याच्या होणाऱ्या मुलाबद्दल बोलतो. आपल्या बाळाला मसाई माराला घेऊन जाण्यापासून ते जुळी मुलं होण्यापर्यंत अनेक ईच्छा त्याने बोलून दाखवल्या आहेत. अलीकडेच, त्याने एका मुलाखतीदरम्यान मुलाच्या नावाची चर्चा केली आहे.
संवादादरम्यान तिला विचारण्यात आलं की, 'कपूर कुटुंबातील जवळपास सर्वच पुरुषांची सुरुवात 'आर' ने होते, त्यामुळे तोही आपल्या मुलाचं नाव 'आर' वरुन ठेवणार आहे की, दुसरं काही नाव ठेवण्याचा त्याने विचार केला आहे?' यावर रणबीर म्हणाला की, त्याने आपल्या मुलासाठी 'आर' आणि 'आर'शिवाय अनेक नावांचा विचार केला आहे. यासोबतच अभिनेत्याने असंही त्याने सांगितलं की, 'जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मुलाला तुमच्या मांडीवर घेणार आणि अचानक तुमच्या मनात नाव येतं, तो क्षण सर्वात खास असतो.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या अभिनेता त्याच्या आगामी 'शमशेरा' चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरशिवाय संजय दत्त आणि वाणी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय तो आलिया भट्टसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, त्याचा 'एनिमल' चित्रपट आणि 'लव रंजन'चा अनटायटल प्रोजेक्टचाही या यादीत समावेश आहे.