15 वर्षाच्या मुलाकडून सुष्मिता सेनची छेडछाड; उचललं मोठं पाऊल
सुष्मिता सेन तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाच्या 46 व्या वर्षीही ती फिटनेसच्याबाबतीत नवख्या अभिनेत्रींना मात देताना दिसत आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी युनिव्हर्स सुष्मिता सेन ( Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच सुष्मिता सेन हिला तिची मोठी मुलगी आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांच्यासोबत मुंबईतील सांताक्रूझमध्ये शॉपिंग करताना दिसली. ब्रेकअपनंतरही ती बॉयफ्रेंडसोबत दिसल्यानंतर यूजर्सनी तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याच कारणामुळे सुष्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सुष्मिता सेन तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. वयाच्या 46 व्या वर्षीही ती फिटनेसच्याबाबतीत नवख्या अभिनेत्रींना मात देताना दिसत आहे. सुष्मिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि ती स्वत:चे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. मात्र तिच्याबद्दल एक माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सुष्मिता सेन अनेकदा महिला सशक्तीकरणाच्या बाजूने आवाज उठवत असते. सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
सुष्मिता सेनने वयाच्या 24 व्या वर्षी एक मुलगी दत्तक घेतली आज ही अभिनेत्री दोन मुलींची आई आहे. सुष्मिताने एकदा एका धर्मादाय कार्यक्रमादरम्यान तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा उल्लेख केला होता. यावेळी बोलताना सुष्मिताने सांगितलं की, एकदा एका 15 वर्षांच्या मुलाने तिचा विनयभंग केला.
सुष्मिताचा 15 वर्षांच्या मुलाने केली छेडछाड
सुष्मिता म्हणाली, "एका पंधरा वर्षाच्या मुलाने माझ्याशी गैरवर्तन केलं कारण त्याला वाटत होतं की आजूबाजूच्या गर्दीत मला हे कळणार नाही. पण, तो चुकीचा होता. मी मागून त्याचा हात पकडला. तो फक्त 15 वर्षांचा होता हे पाहून मला धक्काच बसला.". पुढे याचा राग व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ''मी त्याच्या गळ्याला पकडून त्याला माझ्यासोबत नेलं.
मी त्याला म्हणाले, जर मी इथे त्याला बोलले किंवा ओरडले तर त्याची अवस्था वाईट असू शकते. सुरुवातीला त्याने केलेलं त्याचं कृत्य नाकारलं, पण नंतर जेव्हा त्याने माझा राग पाहिला तेव्हा त्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने माफी मागितली आणि मला वचन दिलं की, तो पुन्हा असं कधी करणार नाही."
त्या, मुलाने आपली चूक मान्य केल्यावर अभिनेत्रीने त्याला सोडून दिलं. सुष्मिता पुढे म्हणाली, "मी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही कारण मला समजलं आहे की, पंधरा वर्षांच्या मुलांना अशा गोष्टी एंटरटेंन्मेंट नसून गुन्हा आहे हे शिकवलं जात नाही".
''ताली' ही सुष्मिताची पुढची वेब सिरीज आहे
सुष्मिताच्या 'आर्या' आणि 'आर्या 2' ला खूप पसंती मिळाली. आता लवकरच ही अभिनेत्री तिच्या आगामी वेब सीरिज 'ताली'मध्ये ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे.