ऐश्वर्याचा `तो` बोल्ड किसिंग सीन बच्चन कुटुंबांने चित्रपटामधून काढायला लावला तेव्हा...
Aishwarya Rai Kissing Scene: सध्या माजी मीस वर्ल्ड असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि बच्चन कुटुंबामधील कथित वाद चर्चेत असतानाच तिच्या लग्नाआधीचा हा किस्साही चर्चेत आला आहे.
Aishwarya Rai Kissing Scene: बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक म्हणजे बच्चन कुटुंब! सध्या बच्चन कुटुंब कथित वादामुळे चर्चेत असून बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायचं कुटुंबाबरोबर फारसं जुळत नसल्याची चर्चा आहे. अमिताभ बच्चन यांच्या लेकाशी म्हणजेच अभिषेक बच्चनपासून ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याची चर्चा मनोरंजनसृष्टीबरोबरच सोशल मीडियावरही आहे. अनंत अंबानींचं लग्न असो किंवा बच्चन यांचा नातू अगत्य नंदाच्या 'आर्चिज' चित्रपटाचा प्रमिअर असेल सगळीकडेच ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळी दिसून आली. त्यामुळेच या कथित वादाच्या चर्चांना अधिक जोर मिळत असला तरी कोणीही कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. असं असतानाच आता ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबियांचे अनेक किस्से सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. याच किस्सांमध्ये एक असाही किस्सा आहे जेव्हा बच्च कुटुंबियांच्या सांगण्यावरुन ऐश्वर्याचा एक किसींग सीन चित्रपटामधून डिलीट करण्यात आला होता.
अचानक गायब झाला तो सीन
ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघे 20 एप्रिल 2007 रोजी विवाहबंधनात अडकले. मात्र हे लग्न होण्याच्या अवघ्या काही महिने आधी प्रदर्शित झालेल्या 'धूम-2' चित्रपटामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र झळकले होते. लग्नाच्या आधीचा हा दोघांचा शेवटचा एकत्र चित्रपट होता. मात्र या चित्रपटामध्ये ऐश्वर्याची जोडी ऋतिक रोशनबरोबर होती. त्यामुळेच या चित्रपटातील कथनानकानुसार त्यामध्ये ऐश्वर्या आणि ऋतिक रोशनचा एक किसिंग सीन होता. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यामध्ये हा सीन दाखवण्यात आला होता. मात्र नंतर हा सीन अचानक गायब झाला.
सीन हटवल्यानंतर दिग्दर्शकांनी शब्दही काढला नाही कारण...
अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबाने 'धूम-2' चे निर्माते असलेल्या यशराज फिल्मसला हा सीन चित्रपटातून हटवण्याची विनंती केली होती. त्यानंतरच हा सीन हटवण्यात आला. 'न्यूज 18 इंग्रजी'ने दिलेल्या वृत्तानुसार 24 नोव्हेंबर 2006 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधून ऐश्वर्या आणि ऋतिकवर चित्रित झालेला बोल्ड किसींग सीन हटवण्यात आल्याने दिग्दर्शक संजय गढवी नाराज होते. मात्र त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नव्हती. या वादामुळे आपलं आणि यशराज फिल्मसचं नातं खराब होऊ नये म्हणून संजय गढवींनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.
थेट कोर्टात गेलेलं प्रकरण; ऋतिकशी बोलणं बंद
त्यावेळी या किसींग सीनमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका वकिलाने थेट ऐश्वर्या आणि ऋतिकविरुद्ध खटला दाखल केला होता. मात्र पुढे या प्रकरणात काहीच घडलं नाही. अवघ्या काही महिन्यांमध्ये सून होणार ऐश्वर्याचा या किसींग सीनला बच्चन कुटुंबाची परवानगी नव्हती. काही रिपोर्ट्सनुसार हा किसींग सीन पाहिल्यानंतर अभिषेकने ऋतिकशी बोलणं बंद केलं होतं.
विनंती झाली मान्य
लग्नाआधी होणाऱ्या सुनेची प्रतिमा उजाळण्यासाठी आणि अधिक वाद होऊ नये म्हणून बच्चन कुटुंबाने हा सीन काढून टाकण्याची विनंती केल्याचं सांगितलं जातं. यशराजनेही बच्चन कुटुंबाची मागणी मान्य करत हा सीन चित्रपटामधून हटवला होता.