जेव्हा बिग बींवर भडकला होता संवाद लेखक, म्हणाले ‘लाज वाटायला हवी, तू हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहेस!’
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे शहेनशहा म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना एक डायलॉग बोलता न आल्याने कालिया फिल्म चे दिग्दर्शक टिनू आनंद यांनी फटकारले होते, तेही तब्बल 200 लोकांसमोर...!!
Amitabh Bachchan get scolded : बॉलिवूडचे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवताना दिसतात. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. पण तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडचे शहेनशहा म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना एक डायलॉग बोलता न आल्याने दिग्दर्शकाने फटकारले होते, तेही तब्बल 200 लोकांसमोर...!!
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच 'अँग्री यंग मॅन' म्हणूनही ओळखले जाते. 70 ते 80 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत 180 हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक टिनू आनंद यांनी न्यूज 18 ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलचा किस्सा सांगितला होता.
"'कालिया' या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एका सीनचे शूटींग चालू होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना एक डायलॉग उर्दू भाषेत बोलायचा होता. त्यासाठी अमिताभ यांनी खूप वेळा सराव केला. पण तरीही त्यांना तो सीन करताना अडचणी येत होत्या. यामुळे माझ्या वडील अमिताभ बच्चन यांना ओरडले होते.
माझ्या वडिलांना उर्दू भाषेची प्रचंड जाण होती. त्याबाबतीत कोणीही त्यांच्याशी वाद घालू शकत नव्हते. माझ्या वडिलांनी या चित्रपटातील एका पार्टी सीनचे संवाद लिहिले होते. या सीनमध्ये अमिताभ बच्चन हे प्राण यांना उत्तर देत आहेत, असा सीन होता. यावेळी त्यांना "क्या नजा की तकलीफों में मजा, जब मौत ना आए जवानी में. क्या लुत्फ जनाजा उठने का, हर काम पे जब मातम ना हुआ", असा डायलॉग बोलायचा होता.
माझे वडील सहसा कधी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान येत नसे. पण ज्या दिवशी या डायलॉगचे शूटींग होणार होते, त्या दिवशी ते सेटवर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांना डायलॉग बोलताना ऐकले आणि म्हणाले, "मुला, ही उर्दू आहे. बोलण्यात थोडा वजनदारपणा आण." पण अमिताभ यांना तो डायलॉग बोलताना अडचणी येत होत्या. त्यावेळी अमिताभ माझ्या वडिलांना म्हणाले, "सर हे माझ्याकडून होणार नाही."
त्यावर माझे वडील हे अमिताभ बच्चन यांच्यावर भडकले. "तुला लाज वाटायला हवी. तू हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहेस. तू त्यांच्या छत्रछायेखाली मोठा झाला आहेस आणि तू सांगतोस की तुला हे जमत नाही." माझे वडील अमिताभ बच्चन यांच्यावर ओरडले तेव्हा तिथे 200 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांना ओरडल्यावर त्या ठिकाणी पूर्णपणे शांतता पसरली होती.
माझ्या वडिलांचा ओरडा ऐकल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, "सर मला १० मिनिटे द्या" आणि त्यानंतर अमिताभ बच्चन हे सेटच्या बाहेर गेले. त्यानंतर ते सेटवर परतले तेव्हा त्यांनी सर्वांनाच चकीत केले. त्यांनी तो डायलॉग अपेक्षेप्रमाणे म्हटला आणि तो सीन पाहून माझ्या वडिलांनी टाळ्या वाजवत त्यांना मिठी मारली होती", असा किस्सा दिग्दर्शक टिनू आनंद यांनी सांगितला.