मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितची नवी वेब सीरिज 'द फेम गेम' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. द फेम गेमच्या प्रमोशनसाठी माधुरी दीक्षित 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचली होती. माधुरी दीक्षितने कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मासोबत खूप धमाल केली. तसंच अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनेक किस्सेही शेअर केले. माधुरी दीक्षित कॉमेडी शोमध्ये सांगतेय की, तिच्या घरात एक अज्ञात व्यक्ती कशी घुसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द कपिल शर्मा शो'च्या एपिसोडचा नवीन प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षितने एका अज्ञात व्यक्तीच्या घरात प्रवेश केल्याचा किस्सा शेअर केला आहे. माधुरी दीक्षित म्हणतेय की, 'एकदा तिच्या घरातील स्वीचबोर्ड खराब झाला होता. चार लोकं तिच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी आले होते. त्यांनी ते काम केलं.काम पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना जाण्यास सांगितलं.


जेव्हा तीन लोकं तिथून निघून गेली तेव्हा चौथा तिथेच उभा राहिला. यानंतर अभिनेत्री त्याला विचारलं, तू त्यांच्यासोबत जात नाहीस का? यानंतर तिला प्रतिउत्तर देत ती व्यक्ती म्हणाली की,  मी त्यांच्यासोबत आलोच नाही. मी तर तुम्हाला भेटायला आलोय. माधुरी दीक्षितच्या फॅन्सची गोष्ट ऐकल्यानंतर कॉमेडी शोमध्ये उपस्थित असलेले सगळेजण जोरजोरात हसू लागले. 



माधुरी दीक्षित वेब सिरिजच्या माध्यमातून  OTT वर पदार्पण करणार आहे. माधुरी दीक्षितची वेब सिरीज 'द फेम गेम' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिरिजमध्ये अभिनेत्री संजय कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.