अमिताभच्या एसएमएसला अनुष्काने दिल नाही उत्तर, पुढे असं काही घडलं
अमिताभ यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक एसएमएस केला होता. बिझी शेड्युल्डमुळे कदाचित अनुष्काने हा एसएमएस पाहिला नाही
नवी दिल्ली : बॉलीवुडचे शहेनशाह अमिताभ बच्चन ट्विटरद्वारे आपले सहकलाकार आणि बॉलीवुड नायक-नायिकेंशी संवाद साधत असतात. तसेच खास क्षणांच्या दिवशी त्यांना शुभेच्छाही देत असतात. अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये एक छानसा किस्सा झाला. १ मे ला अनुष्काचा वाढदिवस होता. अमिताभ यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक एसएमएस केला होता.
बिझी शेड्युल्डमुळे कदाचित अनुष्काने हा एसएमएस पाहिला नाही. अमिताभ बच्चन इथेच थांबले नाहीत. एसएमएसचं उत्तर मिळालं नाही म्हणून त्यांनी ट्वीट करत अनुष्काला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. अमिताभ आपल्या ट्वीटमध्ये म्हणतातस अनुष्का शर्मा...अनुष्का..मी अमिताभ बच्चन आहे...१ मेला मी तुला एसएमएस करून शुभेच्छा दिल्या होत्या..काही उत्तर आलं नाही...नंबर चेक केला तर असं समजल की तुम्ही नंबर बदलला आहे...पुन्हा एकदा शुभेच्छा...खूप सारं प्रेम...काल रात्री तुम्ही आयपीएलमध्ये खूप छान दिसत होतात.'
काय म्हणाली अनुष्का ?
अमिताभ यांच्या ट्विटला अनुष्का शर्मानं उत्तर दिलं. खूप खूप आभार सर, माझा जन्मदिवस लक्षात ठेवून शुभेच्छा देण्यासाठी. (तुमच्या एसएमएसच्या बदल्यात मी हे ट्वीट केलयं.) यामुळे ट्विटरकरांच मनोरंजन झालं. पण अमिताभ यांचे आभार मानताना हे त्यांच्या एसएमएसचं उत्तर आहे हे सांगायला ती विसरली नाही हे त्यात विशेष.