मुंबई : बॉलिवूडच्या गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आशा भोसले त्यांच्या गाण्याच्या प्रवासात अनेक गोष्टींमुळे चर्चेत आल्या. त्यामधील एक म्हणजे जेव्हा त्यांनी हिमेश रेशमियाला कानशीलात लगावण्याची धमकी दिली होती. हिमेशनं एकदा आरडी बर्मन यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. आरडी बर्मन कधी-कधी नाकात गातात. हिमेशच्या या वक्तव्यामुळे आशा भोसले यांना प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्यांनी हिमेशला कानशीलात लगावण्याची धमकी दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमेश सांगत होता की, 'गाण्याची गरज लक्षात घेत आरडी बर्मन कधी-कधी नाकात गातात.' यावर उदाहरण देत हिमेशने स्वतःच्या 'आशिक बनाया' गाण्याचा देखील उल्लेख केला होता. हिमेश म्हणला, 'हाय पीच गाताना नेजल वॉइसचा टच येतो. असं प्रसिद्ध कंपोझर आणि गायक आरडी बर्मन यांच्यासोबतही होत असे.' पण हिमेशचं हे वक्तव्य आशा भोसले यांनी बिलकूल आवडलं नाही. 


त्यानंतर आशा भोसले यांनी हिमेशला कानशिलात लगावण्याची धमकी दिली. पण हिमेशने त्यांची माफी देखील मागितली. आशा भोसले यांनी देखील राग न करता हिमेशला मोठ्या मनाने माफ केलं. त्यानंतर आशा भोसले आणि हिमेश एका संगीत कार्यक्रमात एकत्र झळकले होते. 


आशा भोसले यांनी अनेक चित्रपटांमध्ये तब्बल 10 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांची गाणी बॉलिवूड चित्रपटांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली आहेत. आज देखील त्यांची गाणी चाहते तेवढ्याचं उत्सुकतने ऐकतात.