मुंबई : बॉलिवूडमध्ये काहींचे नाते दिर्घकाळ टिकतात तर काहींच्या नात्यात अवघ्या काही दिवसांतच कटूता येते. अलीकडे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचे नाते बहरताना दिसत आहे. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका - अर्जुन नेहमी एकत्र दिसतात. एका पत्रकार परिषदेवेळेस अरबाजला मलायका - अर्जुनच्या नात्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो प्रश्नाचे उत्तर न देता व्हिडीओमध्ये सतत हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाजला प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तो जोरजोरात हसू लागला. तो पत्रकारंना म्हणाला, 'हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही रात्रभर विचार केला असणार, आता मला ही उत्तर देण्यासाठी वेळ हवा आहे. मी या प्रश्नाचे उत्तर उद्या दिले तर चालेल का?' असा उलट प्रश्न त्याने पत्रकारांना विचारला. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायका - अर्जुन 19 एप्रिल 2019 ला विवाह बंधणात अडकणार असल्याच्या चर्चंना उधाण आले होते. बॉलिवूडमधील मोस्ट पॉप्यूलर कपलच्या यादीत या जोडप्याचा अव्वल क्रमांक लागतो. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खान आणि बोनी कपूरचा अर्जुन - मलायकाच्या नात्याला विरोध आहे. सलमानचा 'दबंग-3' चित्रपट  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात मलायकाला सुध्दा काम मिळाले असल्याचे समोर येत आहे. पण सलमानने चित्रपटाच्या आयटम सॉन्गची जबाबदारी अभिनेत्री करिना कपूरला दिली आहे.